vaakI

वाकी स्थाने
पूर्वार्ध
मढ । वांकीये मढीं अवस्थान : गावा पश्चिमे मढ पूर्वाभिमुख: भितरी चौकीं अवस्थान मास १ : रिगतां डावेया हाता बाहेरी पटिसाळे आसन तोचि खांब आंगणी मादनें स्थान : मढा उत्तरे परिश्रय जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख : 1:
वंकनाथ । मढा उत्तरे पांडा ६ वंकनाथाचें देउळ पूर्वाभिमुख चौकीं आसन : वंकनाथाचें भिडी आसन : मढा आणि देउळामध्यें संदीसी लघुपरिश्रय: मढा : तिचे पटिसाळे आसन : इशान्ये पांडा १० जोगेश्वरीचें देउळ पूर्वाभिमुख : १८ कनाथा वायव्ये नैचिये थडिये पिंपळ : तयातळी आसन: ।
उत्तरार्ध
नारायणमढ । वांकीये नारायणमढीं अवस्थान दिस १५ : एकी वासना दिस ३ : मढ पूर्वाभिमुख : खांबा २४ वरी उभिला : भितरी चौकीं अवस्थान : पुढें पटिसाळ:
निगतां उजवेया हाताचेया खांबासीं टेंकौनि गोसावी चरणचारी उभे ठाकलें : 1: आंगणी मादनेंस्थान मढामागें आसन : त्यासि उत्तरे परिश्रय : । :
वंकनाथ महालक्ष्मी । मढा उत्तरे वंकनाथाचें देउळ पूर्वाभिमुख: त्याचे चौकीं आसन : त्यासि पूर्वे पांडा ७ एकी वासना १२ महालक्ष्मीचें देउळ इशान्यकोणा आश्राइत पूर्वाभिमुख: पुढां पटिसाळ: जोगनायकां भेटि : देउळाचा उंबरा : देउळा भितरी महालक्ष्मीये दक्षिणे आसन : महालक्ष्मीचें देउळ खांबा २४ वरी उभिलें : एकी वासना तेथ अवस्थान जालें : तेथिला स्थानाचे इशान्ये परिश्रय ॥
3D video released...!!