kr/jaKaeD



करंजखेड स्थाने
वड । करंजखेडीं पानुनायकाचे हाटघरीं अवस्थान : मग गोसावी करंजखेडासि बीजें केलें : गावा पूर्वे नदी : ते नदी दक्षिणे वड : त्या वडाखाली आसन जालें बाइसे गावांतु गेली आणि बिढार पाहुनि आली :
आणि गोसावियांपुढां सांघितले तें गोसावी मानिलें :
हाटगृह । मग गावांतु बीजें केलें : गावांतु पूर्व-पश्चिम हाटवटी : ते हावटीचा उत्तरीली ओळी पश्चिमिली सीरा हाटघर होते : ते हाटघरी गोसावियांसि अवस्थान जालें मास २ : दोन्ही द्वारे : एक उत्तरे :
एक दक्षिणे' : दक्षिणेचें दार बुजविलें : मग उत्तरीचेनि दारें गोसावी राज्य करु लागलें : आवाराचा दारवठा पूर्वाभिमुख : भितरी दुसरी चौकीं पूर्वाभिमुख : आंगणी मादनेंस्थान :
भटां महादाइसा भेटि :
प्रकाशदेवाची गुंफा । गावा उत्तरे नै पैलाडी देउळांतु प्रकाशदेवाची गुंफा पूर्वाभिमुख : भितरी आसन : तेथौनि येतां नैमध्ये वाळवंटीं प्रकाशदेवां भेटि :
रामनाथ, गुंफा । रामतीर्थ (रामनाथ) उत्तराभिमुख : चौकीं आसन : जगतीचा दारवठा उत्तराभिमुख : पूर्वे खिडकी : रामतीर्था (रामनाथा) पूर्वे जगतीआंतु गुंफा उत्तराभिमुख : तेथचि दुसरी गुंफा करवणें
: रामनाथापूर्वे पिंपळ : एकी वासना रामनाथा नैऋत्यकोनी पिंपळ : 'तेथ' आसन : तेथ वानरा नामकरण : एकी वासना तो पिंपळ रामनाथा उत्तरे
आंबा, भटां होडे अदृश्य । रामनाथा उत्तरे पौळीबाहिरी आंबा : तेथ विहरण' तया आंबेयातळी आसन : तेथ पाठकत्यागु परीहासु : तिकडेचि परिश्रय 'रामनाथाकडुनि येता' मार्गी लवणांतु भटां
थापे होडे अदृश्य होणें
सेंदुराळे । एकु दिसु गोसावियांसी उदेयाचा पूजावसरु जालेंयानंतरे सेंदुराळेयासी बीजें केलें : गावा वायव्ये दूरी सेंदुराळें डोंगराआंतु : तळेयाचिये नैऋत्यकोनी पाळीवरी आसन :
भटी लोहवीं कमळीं पूजा : पाणुनायका सितळानंदु नामकरण ! एकी वासना पश्चिमिली पाळी पूर्वाभिमुख आसन : तेथ सितळानंद नामकरण सो पेमलदरा ।
तळेया पूर्वे दूरी पेमलदरा : एक म्हणति एक दिसु गोसावी पेमलदरेयासी 'विहरणासी बीजें केलें : एवं पेमलदरा : करंजखेड :
3D video released...!!