KaDk]lI
महानुभाव पंथीय 'खडकुली' स्थानाचा सर्वज्ञ श्रीचक्रधर कालीन भौगोलिक सचित्र आलेख नकाशा.



खडकुली स्थाने
गुंफा । खडकुलिये गुंफे अवस्थान : गोसावी खडकुलियेसी बीजें केलें कपाटीची गुंफा पूर्वाभिमुख तिस दक्षिणेचि भिंती होती वरकडा भिंती घालुनि गोसावी दोन गुंफा करविलिया :
दक्षिणाभिमुख गुंफे अवस्थान हे रामेश्वरबा पूर्वाभिमुख गुंफे अवस्थान हे परशरामबा गुंफे मास अढिच ' मास ३ : शोध मास ४ गुंफा पूर्वाभिमुख पुढें पटिसाळ पूर्वाभिमुख:
गुंफेचा उंबरा माजिघर भितरी वोटा पूर्व-पश्चिम " भितरी पश्चिमिली भितीसी' उत्तर-दक्षिण वोटा करविला भिती समयी : तया वोटेयावरी विसेख १३ : दोहीं गुंफा मध्ये चणक
भारेयापासी बीजें करणें * :
पटिशाळे भेटि । बाहेरी पटिसाळेचे सीरां उत्तरीले सेवटीं वोटा तया वोटेयावरी आसन : तेथचि सीमुगे सणीचें सिंपणे तेथचि दुपाहारीचा पूजावसरु :
तिहीं पर्वकाळीची पूजा तेथचि देवा भटां महादाइसां आबाइसां उमाइसां भेटि तेथचि भटां अनुसरण शोध 'दादोसाची विनती ते स्थान' गोसावी 'प्रथम' गुंफे दक्षिणे बीजें केलें :
हिराइ गुंफे पूर्वे बीजें केलें पाठीं गुंफेपूर्वे पांडा २०' बीजें केलें : तेथ आसन जालें तेथचि पांगुळ स्तुतीचा तोखु : गुंफेचिये पटिसाळे दक्षिण विभाग इंद्रभटां फुटा प्रसाददान :
पटिसाळे रिगतां डावेया हाता आसन : १. तेथ दायंबा भेटि २. तेथचि उदेया पटिशाळेसी" काउळगाविचेया विष्णुभटां भेटि ३. भुतानंदाकरवी पुरीया खाववणे ४. बोणेबाइया भेटि
५. तेथचि सारंगपंडिता भेटि ६. उपाध्यां भेटि ७. महाजना भेटि ८. दैवादि मार्ग निरुपण सावखेडाचे कमळनाभी महात्मे त्यासि भेटि :
तेही गोसावियाते विनविले : "जी जी काही निरुपावे जी : " ९. विद्वांसा भेटि : गुणकार्य निरुपण १०. खेइगोइ भेटि : एकी वासना ग्रहसारंगपाणि भेटि ११.
महादाइसें निवारीत स्त्री केळदान तिची भेटि १२. राणाइसां भेटि १३. योनी आपलो भेटि १४. लखदेवोबा भेटि १५. कामाइसां भेटि : सोवासीन म्हणणें १६.
लाहीदेवभटां भेटी बिढारावरी बिढार १७. गांगाइसा भेटि १८. एल्हणभटां भेटि एवं पटिसाळेसी भेटि १८ :
गुंफेपुढें आंगण पूर्व-पश्चिम : ते आंगणी विसेख ४ : बहुत रवण : दक्षिणे वेढे पूर्व-पश्चिम : गुंफे पुढीला खडकावरी रामिचियां बोणेबाइयाँ भेटि :
आंगणी भयनिमित्तें आउसा निरुपण : भक्तिजनाची गुंफा दक्षिणाभिमुख: ते गुंफे उत्तरे
अनुवर्जित बीजें करणें तेथ लखुदेवबा भेटि कपार्टी आसन विहार : भक्तिजनाजवळी गोसावी बीजें केलें गुंफेच्या आंगणासमोर खडक पूर्व-पश्चिम :
पश्चिमेचे सेवटीं दक्षिणाभिमुख उभया राहुनि खडका दक्षिणे उदकांतु सांडोवा बांधणें : तेयाखालिला आंगीं आसन तेथ मार्तंडा प्रमाण तेथचि भोजेया पाहाटाविलें म्हणणें :
त्यासि उत्तरे खडकावरी उपाध्याकरवी होळी करवणें : सिमुगा सिंपणें, राखेचें दुसरें विळचां उदकाचें गुंफे दक्षिणे मादनें स्थान गुंफे वायव्ये परिश्रय:
ढग । गुंफे पश्चिमे मार्ग मार्गे बीजें केलें' : गुंफेवरी पश्चिमे ढगु : त्या ढगावरुन भविष्यनगर दाखवणें :
नृसिंह | " भटां बाइसां ऋद्धिपुरा पाठवितां ऐलाडीले संगमेश्वराचिये पौळीपर्यंत बीजें करणें : नृसिंही चौकीं पूजा आरोगणा: गुळळा विडा वसति जाली :
देउळ पूर्वाभिमुख तथा जगतीचाही दारवठा :
गोविंद कपाट । गुंफेपूर्वे पांडा १५ कपाट पश्चिमाभिमुख: ते गोविंदावरी' पड़ीलें : तेथ गोसावी बीजें केलें तेथ चरणचारी उभे राहुनि तयाची क्रीया करविली :
सर्पद्रष्ट्र माळी, रुदन, आळंच । गुंफे पश्चिमे पांडा १५ वाडेगावीचा माळी सर्पदंष्ट्र जाला होता ते सातां दिसाची दाटी एकी वासना ती दिसाची दाटी हे परशरामबा :
तेया दक्षिणे समिपचि खडकावरी भट रुदन निषेध' : रुदनाचिया खडका दक्षिणे सांडोवा : तेथचि खडकावरी आसन सांडोवेया उत्तरे होळी :
होळीपश्चिमे मार्तंडा प्रमाण घेणें : गुंफे पश्चिमे पांडा १५ खडकावरी चरणचारी उभयां राहुनि देवा आळोंच गुंफे पूर्वे 'दुरी" लघुपरिश्रय
कोहके, शेत, गोफणानुकार । सांडोवेया दक्षिणे कोहोकें एकी वासना सांडोवेया पुढां पांडा १५ कोहोकें रात्रीं आरोगणा जालेंयावरी सांडोवा उतरोनि :
त्या सेताची वाट गोसावी "पैलाडीला " नायगावीचेया सेतासि बीजें केलें गंगेचिये दक्षिणीलिये थडीयेसिचि ते वाटे दक्षिणे सेत त्या सेताचिये मेरेसि खीळा :
ते सेती जोन्हळा होता मग गोसावी माळेयावरी आरोहण जालें : आणि गोफणेचा अनुकारु करु लागले त्या सेता दक्षिणे गहु होता त्याच्या वोम्बिया घेववीलिया मग
गोसावी बीजें केलें :
ढग, मर्गजा । मर्गजे नैऋत्यकोनी नरसिंहाचे देउळ : नरसिंहाचेया देउळापासी ढगु : त्या ढगासमिप उभया राहुनि मग नरसिंहापुढें बीजें केलें एकी वासना नरसिंहापुढूनि
मर्गजेसि बीजें केलें : देउळी डोहाचां काठीं पूर्वाभिमुख आसन जालें मग खडकावरी वोंबिया भाजवीलिया : हे गोपाळबा वासना मग गोसावी गुंफेसि
साकरेसीं आरोगणा केलिया : मग गुळळा विडा जाला : मग गोसावियांसी पहुड जाला : मर्गजेपुढें कपाट ते कपाटी देवतेचिये उजवियेकडे उत्तराभिमुख आसन जालें :
कहीं कहीं कपाटी आसन होए एवं खडकुली ॥
3D video released...!!