Skip to Content

MaInagar (isannar)

 


सिन्नर स्थाने


सिन्नर स्थाने, लीळा 

 


श्रीनगर स्थाने

भिलमठ । श्रीनगरीं भिलमढींये अवस्थान मास १ : हिराइ मास २ : शोध मास १० : गोसावी देउळे पाहात पाहात भिलमढीयेसी बीजें केलें तेथ अवस्थान जालें : 

भिलमढीं  उत्तराभिमुख :"उंबरवटु : द्वारसंका : शोध : भिलमढीये देवते पूर्वे रिगतां डावेया हाता उत्तराभिमुख आसन' पटिशाळा पूर्व-पश्चिम' उत्तराभिमुख :

रिगतां डावेया हाता खांबापासी सोरठीये जाडीचें कोंगतें घालुनि एकी वासना प्रावर्ण करुनि मदळसेसि गोसावी चरणचारी उभे असति : “मग तेणें पुसिले : मग गुजरभाखा उत्तर दिधलें' : 

आंगणी मादनेंस्थान : 'तेथचि वेढे करीतां महादाइसां उमाइसां दर्शन : मढीं दवणेपर्व पूजा : उपहारु : भिलमढी उत्तरे एकी वासना पश्चिमे बहिरवांची देउळी पूर्वाभिमुख जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख 

उत्तरे खिडकी : दारवठेंया उत्तरे परिश्रयस्थान : भिलमढा' पूर्वे भिंतीस लघुपरिश्रय : तेथचि उदका विनियोग : पटिशाळे महादाइसां उमाइसां भेटि : 

दारवठेंया बाहिरी पूर्वे पांडा ५ महादाइसां" बोळवितां राहावणें : दारवठेंयांतु रिगतां देवां भटां आबाइसां भेटि : वासना 'देवा भटां भेटि मढीयेभितरी" : 

दारवठेंया उत्तरे जवळीचि कोणासमिप भटां श्लेष्मा ॥

एकी वासना भिलमढापूर्वे परिश्रय: परशरामबा वासना दुसरी भिलमढीं अवस्थान : "हाचि अनुक्रमु तेथ :


पाट । उदेयाचा पूजावसरु जालेंयानंतरे' गोसावी गावापश्चिमे पाटाकडे विहरणासी बीजें केलें : पाट उतरतां डखलेयाचा पावो अवटळला तो विसेख :

आवेश्वर, पटीशाळा । गावा उत्तरे नैचिये थडीयेसी आवेश्वराचें देउळ पूर्वाभिमुख जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख : शोध : घाटीं पटिशाळ

चतुर्मुख, नारायण । भिलमढा पश्चिमे चतुर्मुखाचें : एक म्हणति :

चतुर्विधाचें' देउळ पूर्वाभिमुख : चौकीं आसन : भिलमढा वायव्ये नारायणाची देउळी पूर्वाभिमुख : भितरी चौकीं आसन : विहारु : 

वैजनाथ । गावा अज्ञे नैचिये थडीये वैजनाथाचें देउळ पूर्वाभिमुख : त्यासि चौक तीन : जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख : उत्तरे खिडकी : शोध तोचि घाटु ! घाटापूर्वे चंडीकेची पटिशाळ

गोंदेश्वर । भिलमढा इशान्यकोनी गोंदेश्वरापुढें पद्मेश्वरु कथन : पद्मेश्वरा पश्चिमे उच्चवटीं गोंदेश्वरु पूर्वाभिमुख चौकीं आसन : पटिसाळ उत्तर-दक्षिण पूर्वाभिमुख : 

रिगतां डावेया हाता पटिसाळे बाळाणेनसीं आसन तेथौनिचि गोंदेश्वरा पुढें पद्मेश्वरु कथन: परी पद्मेश्वरा बीजें केलें नाही' : जगतीस दारवठें २ : एक पूर्वाभिमुख : एक उत्तराभिमुख : पश्चिमे खिडकी :

एकी वासना दक्षिणे : स्थानें ४ :

पद्मेश्वर । त्याचीपुढां पद्मेश्वर पूर्वाभिमुख: चौकासी दारें तीन एक पूर्वाभिमुख : एक उत्तराभिमुख : एक दक्षिणाभिमुख जगतीस दारवठें २ : एक पूर्वाभिमुख एक दक्षिणाभिमुख : उत्तरे खिडकी : ।।

गावा पश्चिमे पाटु: तेथ डखलेयासी खेळु : मढीयेपूर्वे दुरी नगरमहाद्वार : एक पश्चिमे परी अनिर्देश्य ये स्थानें ३ : एवं श्रीनगर स्थानें २१ : ।: एरें देउळें आदि पिढीपाठ चरित्राचेनि क्रमें न लगतीं ।


 3D video released...!!

सिन्नर 3D video. 

https://youtu.be/289zrJutPso