मेहकर


मेघंकर स्थाने
बाणेश्वर । मेघंकरीं 'बोणेबाइयां भेटि" : बाणेश्वरीं अवस्थान : मास १० : गावापूर्वे बाणेश्वराचें देउळ पूर्वाभिमुख" : 'चौक : उंबरवट" जगतीस दोनि दारवठें एक दक्षिणाभिमुख : एक उत्तराभिमुख :
पाइरीया ५ : उत्तराभिमुखे दारवठां रीगतां डावेया हाता सोंडी : सोंडीयेवरी एक सूडा श्रीमुगुटीं : एकु सूडा कटिप्रदेशीं लोंबता श्रीचरणी पूर्वाभिमुख आसन : ऐसी बोणेबाइयांसी भेटि जाली :
पश्चिमे खिडकी : देउळा पश्चिमे तळें : तळेयाचिये पाळी आसन : तोचि घाट :
बोणेबायांची गुंफा । बाणेश्वरा अज्ञकोनी 'जगतीआंत बोणेबाइयांची गुंफा उत्तराभिमुख : ‘गुंफेसि भितरी डावेया हाता वोटा : बाहिरी डावेया हाता वोसरी : गुंफेचें आंगण : देउळाचा दक्षिणिल' आडवांगी'
'तस्करांचा प्रसंग : आंगणी मादनेंस्थान : गुंफे पश्चिमे आभासु' :
भैरवाची देउळी । बाणेश्वरा वायव्यकोनी भैरवाची देउळी पूर्वाभिमुख' : 'तेथ पहुड : तोचि उंबरवटु : तेथ अवस्थान दिस ३ :
परिश्रय,
मार्तंडविहिर, मार्तंडेश्वर । बाणेश्वरा इशान्ये परिश्रयस्थान' : बाणेश्वरा इशान्ये "दुरी" मार्तंड विहिरी : मार्तंड विहिरी पश्चिमिली पाळी मार्तंडेश्वराचें देउळ “सप्तघटा श्रीकरु लावणें : :
पूर्विले पाळी सीळेवरी आसन 'पूर्वाभिमुख'
ब्राह्मणाचा आवार, वाडी । शोधु : मार्कंडविहिरी उत्तरे इशान्यकोना आश्राइत “ते वाडीयेआंतु ब्राह्मणाचा आवारु : तेथ गोसावी बीजें केलें
सारंगधराचे देउळ । मार्कंडवाडी नैऋत्ये आणि बाणेश्वरा पश्चिमे" "माळावरी" गावांतु सारंगधराचें देउळ पूर्वाभिमुख" : "तेथ द्वारावतीकारीं चांदोवा विझवणें : तथा आर्ती आबूथितां श्रीमुखीं आंगुळी
घालणें : मंडपासी तीन दारवठें : एक पूर्वाभिमुख : एक उत्तराभिमुख : एक दक्षिणाभिमुख : पाइरीया पाच-पाच ' देउळा दोनि पौळी : भितरील पौळीसि तीन दारवठें एक उत्तराभिमुख पाइरीया ३ :
एक पूर्वाभिमुख : पाइरीया ३ : एकु दक्षिणाभिमुख : पाइरीया ३ : दुसरीये पौळीचे दोनि दारवठें : एक उत्तराभिमुख पाइरीया २० : भितरी सोंडीया : मंडपासी आसन :
एकु दक्षिणाभिमुख दारवठा हाटवटीचेया खांबाउजु हाटवटी सारंगधराचिया देउळा दक्षिणे पूर्व-पश्चिम : किर्तिखांबापासि पूर्विली आडवांगी एकी वासना पश्चिमिली आडवांगी महिक रोख हरण :
'खाबापूर्वे दक्षिणीलिये गोदरीये : सामाण्यस्त्रीयाचा रामहाट : 'तत्गृही आसन "हाटवटीये दक्षिणे नदी : एवं मेघंकर