iCnnapaapa
महानुभाव पंथीय 'छिन्नपाप' स्थानाचा सर्वज्ञ श्रीचक्रधर कालीन भौगोलिक सचित्र आलेख नकाशा.




छिन्नपाप स्थाने
गुंफा । छिन्नपापीं गुंफे अवस्थान : मास ४ : १. वैसाख २. जेष्ठ ३. आखाड ४. श्रावण ५. भादवा ६. आश्विन ७. कार्तिक ८. मार्गेश्वर ९. पुंस १०. माहो हे मास दाहा :
१. सिमुगा २. चैत्र ऐसा संवत्सर जाए : ।: छिन्नपापीं गुंफे अवस्थान : एकी गुंफा सिधी' होति : दुसरी देवाची : तथा कोन्हा एकाची : ते गुंफा दों खणाची पूर्वाभिमुख :
पुढां पटिसाळ उत्तर - दक्षिण पूर्वाभिमुख : खांबा सोळावरी अवघी गुंफा उभिली : पटिसाळ निरुंद : भितरी पश्चिमेचे भिंतीसीं उत्तर-दक्षिण वोटा पूर्वाभिमुख 'अवस्थानाचा' :
एकी वासना दक्षिणेचे भिंतीसीं पूर्व-पश्चिम वोटा : त्या वोटेयासि चुना पिटविला : तें वोटा विसेख तीन : वोटेयाखाली वस्त्रे ठेवणें : उपान्हौ श्रीचरणी मेळवणें : पिंपळे वामनभटां भेटि
क्षीर भोजन : भटांकरवी श्वानमुखें खीर खाववणें : ते खीर गव्हाची :।: पुढीले पटिसाळेसि विसेख ४ : गुंफेचा उंबरा निरुंद : कवाडें : पुढां पनाळ : एक पूर्वेचा : एक अज्ञेचा :
आंगणाचे उत्तरविभागीं दुसरा उभाट वोटा होता : तया वोटेयावरी विसेख चार : आंगणी विसेख चार ' : स्त्री पनाळ व्यथा :
पटीशाळा । गुंफेचे पटिसाळे आसन : तेथ रेइनायकाचा उपहार : तेथचि घोगरगावीचिये बाइको भेटि : महाजना भेटि : तेथचि ग्रहसारंगपाणिचिये मातेचा उपहार : आंगणी तुरंगम :
गुंफे पुढें आंगणी मादनेंस्थान : 'अवस्थानाचिये गुंफे दक्षिणे एकी वासना उत्तरे' लघुपरिश्रय : तेथचि उदका विनयोगु : गुंफा करवणें : बादाठाणीहुनि पिंपळवामनभटीं दळवाडें आणीलें : आणि भटीं काही पैलाडीला वडाची सलें काढीलीं : आणि गुंफा उभिली :
:
भक्तिजनांची गुंफा । अवस्थानाचिये गुंफे दक्षिणे भक्तिजनाची गुंफा पूर्वाभिमुख दोहीं गुंफाचिये संदीसि आउसाचें स्थान : ते गुंफेसि संतोष अशक्त होते म्हणौनि तें संतोषाची गुंफा
अवस्थानाचिये गुंफेचे पटिसाळेसि म्हाइंभटां भेटि इंद्रदेवांची भेटि : खेइगोइ भेटि : देगावीचिये ब्राह्मणीचि भेटि : पंचगंगा नामकरण : वेसाइसां भेटि : पाठकाचेया भासेयाची भेटि :
लाहाइभटां भेटि : ग्रहसारंगपाणि भेटि : गुंफे महापूजा :
तांदुळजाचे शेत । गुंफे दक्षिणे तांदुळजयाचें सेत : तें लखुमिया वाहात असे : सं६ भक्तिजनाचिये गुंफे दक्षिणे परिश्रय : एकी वासना पश्चिमे : तेथच गुंफे दक्षिणे तांदुळीजा वावरांतु :
सुश्रुषे राहावणे, गळता हिवर । गुंफे पूर्वे पांडा ८ तथा ६ उदका विनयोगु तेथचि धुत बहिर्वास वेढणें : तयापूर्वे संतोषाचिये सुश्रुषेसि हंसराज राहावणें तयापुढें डांगुरेशा राहावणें :
हिराइ : त्यासि पूर्वे पांडा ४ गळतां हिवरु : केव्हडीं दुःखें : हे रामेश्वरबा : केसणी दुःखे : हे परशरामबा : एकी वासना तिकडेची परिश्रय : त्यासि उत्तरे मार्ग :
तेणें मार्गे गोसावी बीजें करीति :
वोत, तुरंगम, निंब । गुंफे इशान्ये वोत : ते वोती परिश्रय : शोध : दुसरीये गुंफेचें आंगण : गुंफे पश्चिमे तुरंगम : हे रामेश्वरबा : त्यासि पुढें निंब :
तिसरी गुंफा, गारी । अवस्थानाचिये गुंफे उत्तरे तिसरी गुंफा उत्तराभिमुख : ते भक्तिजनाची : ते गुंफे पश्चिमे तिचिये साउलियेसि पश्चिमाभिमुख आसन जालें गोसावी
मातीकामालागी गारी करविली : तिसीं मुंगीया निगालिया' म्हणौनि गोसावी दुसरी गारी निंबाजवळी करविली : तेथील पेंड वहाता सारंगपाणिभटां आणि भटोबासाची उदरव्यथा
प्रसंग : एवं गुंफा : ॥
सिंहनारायण । गुंफे उत्तरे सिंहनारायणाचें देउळ पूर्वाभिमुख : त्याचा उंबरवट : चौक : इंद्रभट अवधुत आले तै चौकीं आसन' : तेथचि मासोपवासनि दर्शन ::
पटीशाळा । सिंहनारायणासि पटिसाळा २ : एक उत्तराभिमुख : एक दक्षिणाभिमुख : भितरी 'जगतीचिये दक्षिणेचे भिंतीसीं पूर्व-पश्चिम पटिसाळ उत्तराभिमुख :
आंगणी मादनेंस्थान : आंगणीहुनि मासोपवासिनीतें पडीताळणें : तेथचि' आंगणी जयंती कारणें विनविलें ४ : तेथ दाइभागवता भेटि : सत्यादेवीचेया गोंदो भेटि :
उपाध्यां भेटि : या आंगणी भेटि तीन : जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख : तोचि उंबरवट
साजे, पार, गरुड, बाबुळ । देउळा पुढा जगतीआंतु साजें : त्या साजेया पूर्वे पार : त्या पारावरी गरुड निळया पाखाणाचा पश्चिमाभिमुख : एकी वासना उत्तर-दक्षिण : तयासि पुष्टी विभागीं टेंकौनि पूर्वाभिमुख आसन : तेथ गणपती आपयोची भेटि आउसांची भेटि : त्या गरुडा पूर्वे जगतीचेया दारवठेयापासि दुफांटी बाबुळ असे : तेथ आउसां सिक्षापण समै तियेखाली आसन
पिंपळ, गोविंद धावनी । सिंहनारायणा दक्षिणे जगतीबाहिरी पौळीसीचि पारु : त्या पारावरी पिंपळ : त्या पिंपळा पश्चिमे पश्चिमाभिमुख आसन : तेथ इंद्रभटांचा उपाहारु आरोगणा' :
।: त्या पिंपळा पश्चिमे पांडा ५ नैऋत्ये निंबु : त्या निंबा पश्चिमे गोविंद धावनी : घोगरगावीचिये सितळगव्हाणीची बाइये भेटि । सिंहनारायणा पश्चिमे तथा नैऋत्ये
जगतीबाहिरी मागिला भिडापासि साउलियेसि आसन : तेथ सितळगव्हाणीचे" बाइको भेटि : तथा घोगरगावीचिये बाइ क्षेमालींगणें आनंदु संचरणें ।
भट नाथोबा पुरांत घालणे, तारणे । सिंहनारायणा वायव्ये भट नाथोबा पुरांतु घालणें : सिंहनारायणा उत्तरे श्रीकरु भवंडणें : एथचि गा एथचि म्हणणें ।
सिंहनारायणा इशान्ये तारणें । सिंहनारायणा इशान्ये फुटा भवंडणें : थडीया थडीया बीजें करणें । सिंहनारायणा उत्तरे ढगु त्या ढगा पश्चिमे पांडा ३ पिंपळ :
त्या पिंपळापासी तारणें :
सुळव्यथा । सिंहनारायणा दक्षिणे जगतीबाहिरी निंब : त्या निंबातळीं भट मुरकुंडी केली कुर्मासनी : एकी वासना भिडापासी : एकी वासना भिडापश्चिमे मुरकुंडी केली :
तेथ गोसावी बीजें केलें : उत्तराभिमुख उभया राहुनि गोसावी भटाची सुळव्यथा निवृत्ती केली :
गांधिया हिवर । सिंहनारायणा उत्तरे पिंपळ : त्या पिंपळा पूर्वे पांडा ४ गांधीया हिवरु
छिन्नस्तळी । सिंनारायणा उत्तरे गंगेचिये थडीये ढग : त्या ढगाखाली छिन्नस्तळी : तीसि सिंहासारखी आकृती' : ते सत्वस्त : श्रिया आधिष्ठीली : तेथ गोसावी प्रतिदिनी विहरणा बीजें
करीति: । सिंहनारायणातळी म्हणौनि छिन्नस्तळी तियेवरी जुंबाडें दोनि होति : ते छिन्नस्तळीवरी पश्चिमाभिमुख आसन होए कदाचित उत्तराभिमुख आसन होए : ऐसें सपुजीत
चौपरी आसन होए : कहीं कहीं विळचां बीजें करीति : कहीं कहीं एकलेयाचि बीजें करीति : तुरंगमारोहण : उतरोनि छिन्नस्तळीयेवरी आसन होए : ।:
भाजीए तीन वासना : वाडेगावीचिये माळीणीनें आणीली : हे रामेश्वरबा : ढगातळीं हे परशरामबा वासना : एकी वासना : वडातळीं माळणीनें वोळगविली :
धानाइसाचिया वासना पोफळीं घेतली : छिन्नस्तळीयेवरी भिक्षान्नाचा काला केला : मग गोसावी श्रीकरीचिया करांगुळीया करुनि भाजी वाढीली : मग गोसावी आरोगीली ।
छिन्नस्तळीये आंगणी भक्तिजनां पांती प्रसादु : वनिताधिकारु : ।: छिन्नस्तळीयेवरी सारंगपंडितां रितहस्त भेटि : देगाविचीये बाइको भेटि : हे रामेश्वरबा : रामेश्वरबा :
छिन्नस्तळीयेवरूनि पुर जात होता तेधवां वरीले खडकीं आसन : तेथ बाइको भेटि : हे परशरामबा : छिन्नस्तळीयेवरी नागोबा दर्शन : ।:
समाधान जालेयावरी रेइनायका भेटि : ग्रहसारंगपाणिसि आणि तयाचिये मातेसि छिन्नस्तळीयेवरी भेटि : एकी वासना गुंफेसि : । : बादाठाणीचिया महाजना भेटि : ।
छिन्नस्तळीयेचां आंगणी दायंबा भेटि : संकतुळसी कथन : नाथोबा भेटि : या छिन्नस्तळीवरी भेटि ८ : । : भटोबासांचेनि उत्तरें केसोबासीं छिन्नस्तळीयेवरी रत्नमाळा स्तोत्र केलें ।
बाइदेवोबायें आणि भानोबें छिन्नस्तळीयेचा पोपडा उचडीला : तो भागवतां कमळाइसासी आणौनि दिधला : इतुकेनि छिन्नस्तळीयेचा प्रवर्त जाला ।
कपाट, आधाडतरु, जळशयन । छिन्नस्तळीये दक्षिणे जवळीचि दरडीयेसी कपाट पश्चिमाभिमुख : तेथ आसन : त्यासि पश्चिमे पांडा ५ भोजया आधाडतरु निरुपण : ।:
भोजया जाया निमित्ते दुःख कथन : तथा सिखासुत्र त्यागु : ।: आधाडतरु असे पिंपळ : तो वारेनि करुनि तिही सवा आंदोळत असे : तो एका मुळावरी असे : ।:
लिंगापासि आसन : तेथौनि पश्चिमे पांडा १० तथ शोध जळशयन : त्या जवळी जळशयना पूर्वे आसन : । :
भांडेभेदन | जळशयना पश्चिमे पांडा २०१ गंगेचीये दक्षिणेचीये थडीयेसि भांडे भेदनाचें खडक' : त्या खडकावरी गज एक उंच खडक : त्यावरी जाडीचें आसन रचीलें :
त्यावरी गोसावियांसी पूर्वाभिमुख आसन होए: कदाचित पश्चिमाभिमुख आसन होए : तो भक्तिजनाचा भोजनता : तयावरी चरित्रे ३ : ।: भांडेभेदनाचा पहिला पोपडा बाइदेवोबें
आणि मेइंदेव भागवती आणि आमरभटीं घेतला : मग भांडेभेदनाचा प्रवर्त जाला :
उंच टेक समस्थळ, पाषाण फोडवणे, दरेदरकुटे बुजवणे, धाववणे, पिंडखडक, देवद्रोणी, जळघोष निवारण । भांडेभेदना पश्चिमे पांडा १६ उंचें टेकें समस्तळें करवणें :
तेथचि पश्चिमे पांडा ३ पाखान फोडवणें : तया पुढें पांडा ४ दरेदरकुटे बुजवणें : तया पश्चिमे हाता चौ धाववणें तया पश्चिमे पिंड खडक : ते पिंडखडकीं कपाटीं हारी पिंड ६ :
त्या पिंडासि गोसावी श्रीकराचें बोट लाविले. ते पिंड दशरथाचें : सर्वज्ञे म्हणितलें : “हे देखिलें गा दशरथाचें पिंड : " म्हणौनि गोसावी श्रीकरें दाखविलें : दुपाहारीचा पूजावसरु
जालेयानंतरें गोसावी पिंडापासी बीजें करीति : तेथ आसन होए : निरुपण होए तैसेचि गोसावी देवद्रोणीसि बीजें केलें : सरीसे चंद्रदेव होते : गंगे पैलाडी देवद्रोणी: तेथ देवता वोवाळणी ।
पिंडापूर्वे वाळवंट : पिंडा उत्तरे जवळीचि लिंग त्या लिंगा पूर्वे आसन : तेथ निरुपण : तेथचि फुटा निक्षेपणी आउसां जळघोसु निवारण : पिंडा पूर्वे आउ पिंडोपहारु :
एकी वासना' ते भांडेभेदनि तो पिंड कान्होबें भंगीला : हारीचे तिन्हीं पिंड ते बोबडे गौराइसीं भंगीले मग तें सीत मार्गासि आलें : पिंडा पश्चिमे आसन : त्याचि ढगावरी भोजनता ::
खडकावरी आसन । पिंडा दक्षिणे माथां खडक त्या खडकावरी उत्तराभिमुख आसन जालें : तेथ म्हाइंभटां भेटि : हे आनोबासांचिया वासना । त्यासि दक्षिणे पांढरेया खडकावरी
गोसावी श्रीचरणचारी उभे असति :
रामनाथ । पांढरेया खडका दक्षिणे रामनाथाचें देउळ पूर्वाभिमुख : भितरी चौकीं आसन : पुढें आंगण जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख: सोंडीया दोन त्या चौ पाखाणाचीया :
दारवठा आडदांडी : दारवठेयांत रिगतां उजवेया हाताचिये सोंडीयेवरी आसन पूर्वाभिमुख: पुढां सारंगपंडित उभे असति : सत्यादेवीचा रवळा, गोंदो उभे असति : गोविंद धावनी :
सिंहनारायणा आणि रामनाथा मध्यें पडिताळणें' : तेथ सारंगपंडिताचें वगत्रुत्व : मग गोसावी गुंफेसि बीजें केलें : तेथ वोटेयावरी आसन । आउसां विंगुळीवधी सिक्षापण :
भटांची वोदनाची झोळी नेवविली : तेही सिक्षापण । मृत्तीका पिंड ग्रहणी मनन । रामनाथा पश्चिमे परिश्रय : रामनाथा मागां उदका विनयोग:। रामनाथाचे भीडीं आसन तेथ भट
नाथोबा सीर मेळवणी सुख भावानुवादु : त्यासि पश्चिमे अग्नीष्टीका: रामनाथा पश्चिमे वोत: त्या वोतांतु उतरणें : हे परशरामबा : वोता वरीलीकडे उतरणें हे रामेश्वरबा: हिराइ वोता
आणि गंगेमध्यें उतरणें : समग्र रामनाथ आणि छिन्नपाप स्थानें ७० : :
रामनाथा पश्चिमे वोत उतरतां वारु 'थडियावणें : तया पश्चिमे महारवाडा : महारवाडेयाचे वाटे समीपचि तिंबत येणें : वरी चांदोवा धरवणें : ।।
3D video released...!!