Skip to Content

बीड

 


बीड overview

 

 


बीड स्थाने.

 


बीड स्थाने

गुंफा, महालक्ष्मी । बीडीं आटवेलिये गुंफे अवस्थान : मग गोसावी अनुक्रमेचि बिडासी बीजें केलें : बिढार पाहात पाहात महालक्ष्मीचेया देउळासी बीजें केलें : शोध : तें महालक्ष्मीचें देउळ पूर्वाभिमुख

जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख : एकी वासना उत्तराभिमुख : जगतीभितरी देउळा दक्षिणे पटिसाळ' : ते पाहात पाहात गोसावी साउमेयां बीजें केलें : महालक्ष्मीचें देउळ घंटाकृत :

त्यासि नैऋत्यकोनी एकी वासना दक्षिणे गुंफा पूर्वाभिमुख : भितरी दक्षिणेचे भिंतीस पूर्व-पश्चिम वोटा उत्तराभिमुख : तया वोटेयावरी अवस्थान मास ४ : एकी वासना मास ३ : पुढा आंगणी मादनेंस्थान' : 

आंगणाचां आडवांगीं निंब' : त्या निंबातळीं आसन' : 1: गुंफे १. परसनायकां भेटि २. पद्मनाभी भेटि ३. रेमनायका भेटि ४. जोगनायका भेटि ५. सारस्वतभटां भेटि ६. सुकिया जोगनायका भेटि ७. 

देवां भेटि ८. भटां भेटि ९. आपदेवोभटां भेटि १०. विद्यावंता भेटि ११. दायंबा भेटि तेथ गोंदो माळ देणें १२. आबाइसां भेटि १३. उमाइसां भेटि १४. सोभागबाइसां भेटि १५. उपाध्यां भेटि आप्तृत्व निरुपण :

ऐसिया गुंफेसि भेटि १५ : ।: महालक्ष्मीये दक्षिणे जगतीची खिडकी तोचि घाटु : घाटीं आसन : 'नदीआंतु देवा भटां भेटि"


दक्षिणेश्वर । गोसावियांसि उदेयाचा पूजावसरु जालेंया नंतरें गोसावी दक्षिणेश्वरा विहरणा बीजें केलें : दक्षिणेश्वराचें देऊळ पूर्वाभिमुख : भितरी चौकीं आसन : तेथ शिष्याचा अभिमानु निरुपण : 

जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख :

कोले घायखंडी । एक दिस गोसावियांसि उदेयाचा पूजावसर जालेयानंतरें गोसावी बनाकडे विहरणा बीजें करीतां मार्गी नैचिये थडियेसि कोलें घायखंडी दाखवणें !'


गरुडी, दायंबा सरावी चुकी । एकु दिस गोसावी गरुडीयेसी विहरणासि बीजें केलें : तेथ आसन जालें : तेथचि दायंबा सराउ चुकी सांघणें : रामेश्वरबास गरुडीये दक्षिणे दायंबा वखरी चुकी सांघणें हे मार्गरुढी ::


 3D video released...!!