saavaKaeDa sa/gamaeSvar

सावखेडा स्थाने
संगमेश्वर । सांवखेडां संगमेश्वरीं लुडी क्रीडा : संगमेश्वरा जातां वाळवंटी विसेख १६ : मग गोसावी संगमेश्वरासि बीजें केलें : संगमेश्वराचें देउळ पूर्वाभिमुख : चौकाचे दारीं आडदांडी :
ते आडदांडीयेपासि राणेयासि भेटि जाली : हिराइ ब्राह्मणा भेटि जाली : तेणें गोसावियांसि मातुळंग ओळगविलें : मग गोसावियांसि चौकीं आसन जालें : मग गोसावी मातुळंग
प्रसाद करुनि लुडी क्रीडा केली :
आबयो रंगमाळिका । मग तेथौनि गोसावी देउळासि बीजें केलें : तेथ गोसावी चरणचारी उभे ठाकले : देउळाचिया पाइरीया ७ पुढा आंगण : हिराइ : दोनि दारशंका धरुनि गोसावी
भितरी अवलोकीलें : मग मागौति खोलबुंथी घालुनि परतले : हिराइ : तेथ आबाइसाचिया रंगमाळीका पुसणें मग गोसावी बाहिरी चौकासी उभे ठाकलें :
आबयो भेटि : हिराइ : सर्वज्ञे म्हणितलें : "बाइ : हे आतां खडकुलियेसि जाइजैल : " संगमेश्वराचिये वायव्यकोनी पौळीबाहिरी परिश्रय :
दोन गुंफा । संगमेश्वरा वाव्यकोनी जगतीआंतु सैंग पटिसाळ उत्तर - दक्षिण पूर्वाभिमुख : ते पटिसाळेचे उत्तरीले सीरां सेवटी गुंफा पूर्वाभिमुख भितरी दक्षिणीली भितीसी
पूर्व-पश्चिम वोटा : तेथ वसति' : एकी वासना तेथ अवस्थान दिस तीन : तेथ भटां ईश्वर प्रतीति करणें : तेथचि उमाइ बिढार प्रसंग : गुंफे पुढां आंगण :
पटिसाळेचे दक्षिणीले सीरां सेवटीं दुसरी गुंफा पूर्वाभिमुख तेथ आरोगणा संगमेश्वराचे जगतीचे दारवठें दोन : एक उत्तराभिमुख : एक दक्षिणाभिमुख : एकी वासना पश्चिमाभिमुख :
उत्तरेचेया दारवठेया पाइरीया ३ : दक्षिणेचेया दारवठेया पाइरीया ८ तथा ९ सोंडीया २ : पाइरीया उतरतां खाली हातां दोन विसेख : तया पुढां हाता चार पाच उपाध्या आणि
विष्णुभटां भेटि : एकी वासना पौळीचेया नैऋत्यकोनापासि भेटि जाली : हे रामेश्वरबा : दक्षिणीली दारवठा पाइरीया उतरतां हाता दों आबयोचि विनति :
उपहार स्वीकार' : गुंफे दक्षिणे खिडकी' : एकी वासना उत्तरे : उत्तरे परिश्रय" : तेचि पटिशाळे वेढे : तेथचि पटिसाळे आसन शोध गुंफेचां आंगणी गोसावी चरणचारी उभे असती
ढग, कपाट । संगमेश्वराचे जगतीबाहिरी नैऋत्यकोनी ढगु तया ढगावरी आसन : तेथ उपाध्या आणि विष्णुभटां भेटि : तेही कणीसाचें कटाळें गोसावियांसी दर्शना केलें :
शोध : सिवनेचे कपाटीं आसन' .१२ : मग गोसावी आवघीं भक्तिजनें खडकुलियेसि पाठविलीं : आपण गोसावी मेघवर्णीये पागेचा धाटा घालुनि सिवनेपासि बीजें केलें तेथ
अवधुताचेया खांदावरी आरोहण होउनि संगमी उतरले : एकी वासना सिवना उतरले आणि पैलाडीले घाटीं उभे राहिले : आणि वस्त्रे वेढीलीं :
घाटीं पाइरीया १० तथा ११ तेथौनि गोसावी पैलाडीला संगमेश्वरास बीजें केलें ॥
3D video released...!!